जळगाव ;- शहरातील भाजपा नगरसेविका सुरेखा सोनवणे यांचे पुत्र उमेश सोनवणे यांच्या वाढदिवसा निमित्त गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . या कालावधीत रोजगार मिळत नसल्याने नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे . अशा गरजू कुटूंबांना वार्ड क्र 14 रामेश्वर कॉलनी मधील नागरिकांना भाजपा नगरसेविका यांनी त्यांच्या मुलगा उमेश सोनवणे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 300 गरजू कुटूंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यावेळी उपस्थित भाजपा नगरसेविका सौ सुरेखा सोनवणे, भाजपा मंडळ सरचिटणीस दिपक बाविस्कर ,गणेश सुदाम सोनवणे, संदीप सुरडकर, महेश खुरपडे, शुभम गरूड, राहूल मराठे ,मुकेश सोनवणे, कुणाल पाटील आदी उपस्थित होते.