जळगाव (प्रतिनिधी ) सध्या कोरोनाचे कडक निर्बंध असल्याने सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना एक तरुण शहरातील बिग बाजार परिसरात बिनधास्तपणे गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस घेऊन फिरताना आढळून आल्याने त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सद्दाम उर्फ युनूस सलीम पटेल रा. गेंदालाल मिल हा तरुण स्वतःजवळ गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धंनजय येरुळे यांच्या सूचनेनुसार अक्रम शेख, विजय निकुंभ , भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर ,रतन गीते, गणेश पाटील आदींच्या पथकाने कारवाई करून त्यास पिस्तूल आणि काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले आहे.