तरसोद शिवारातील घटना ; हजारोंचे नुकसान टळले
जळगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील तरसोद शिवारात आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास एका पॉलीहाऊसच्या शेजारी असलेल्या शेताला आग लागल्याची घटना घडली.


शेतातील कोरडी झाडे झुडपे यांना हि आग लागल्याने पॉली हाऊसच्या संचालकांनी तात्काळ जळगाव मनपाच्या अग्निशामक कार्यालयाला माहिती दिली . यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एका अग्निशामक बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली . दरम्यान पॉलीहाऊसला हि आग पसरून लागली असता हजारोंचे नुकसान टळले आहे.
यांनी आणली आग आटोक्यात
मनपा अग्निशामक विभागाचे कर्मचारी देविदास सुरवाडे,रोहिदास चौधरी, जगदीश खडके,वसंत कोळी नितीन बारी आदींनी हि आग आटोक्यात आणली.







