जळगाव ;- सध्या कोरोना व्हायरसचा धोका अवघ्या जगाला असून गर्दी टाळून मशिदीमध्ये न जाता आपल्या कुटुंबियांसह नमाज अदा करावी असे आवाहन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी मुस्लिम समाजाला केले आहे . यावेळी फारुख शेख यांनी कुराणमध्ये कोरोना सारख्या एखाद्या आजाराची परिस्थिती उद्भवल्यास काय करावे याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने मशिदीमध्ये केवळ पाच व्यक्तींना प्रवेश असून बाकीच्या मुस्लिम बांधवानी घरात बसून नमाज अदा करावी असे आवाहन यावेळी फारुख शेख यांनी केले.