• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगांव,;- कापुस पिकावर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास येत्या हंगामात पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता तातडीने संबंधित सर्व तालुक्यात कापुस पिक क्षेत्राचे सर्व्हेक्षण करुन शेतीशाळा, सभांव्दारे क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत शेतक-यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

किडीचा ओळख- पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो तो नंतर शरीरावर पसरल्याने अळीचे शरीर गुलाबी दिसते.

नुकसानीचा प्रकार – सुरुवातीला अळ्या पाते, कळया, फुलांवर उपजिविका करतात, प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट अमलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळयांना “डोमकळया” म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळी बोंडातील बिया खाते त्याचबरोबर अळीने रुई कातरुन नुकसान केल्याने रुईची प्रत खालावते. तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.

एकात्मिक व्यवस्थापन – कपाशीच्या पिकाची तृणधान्य, कडधान्य किंवा गळीतधान्य पिकांबरोबर फेरपालट करा. मृद परिक्षणाच्या आधारावर खताच्या मात्रेचा अवलंब करावा, अळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा, मित्र कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मेश्रपिके कपाशी पिकाभोवती घ्यावीत, बोंड अळीग्रस्त डोमकळया व बोंडे वेचून नष्ट कराव्यात. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरीता हेक्टरी 5 (कामगंध) फेरोमन सापळे लावावेत. किंवा मास ट्रॅपिंगसाठी हेक्टरी 20 फेरोमन सापळे लावावेत व मुदतीत ल्युअर बदलावेत. कपाशीच्या शेतात हेक्टरी 20 ते 25 पक्षी थांबे लावा, कामगंध सापळयात पतंग दिसताच किंवा अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझाडिरेक्टीन 10,000 पीपीएम 10 मिली प्रती 10 लिटर किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात प्रसारीत करावीत. डिसेंबर/जानेवारी महिन्यात पीक पूर्णपणे काढून टाका त्यापुढे खोडवा/ फरदड घेऊ नका, कपाशी वेचणीचा हंगाम संपताच प-हाटया आणि इतर पालापाचोळा यांचे शेताबाहेर कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करा, किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर खाली नमूद किटकनाशकांची फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी- एक जीवंत अळी प्रती 10 हिरवी बोंडे किंवा प्रती फेरोमन सापळयात आठ ते दहा पतंग सलग 3 दिवस आढळल्यास पुढील पैकी कोणत्याही एक किटकनाशकाची फवारणी करावी.

पहिल्या फवारणीसाठी यापैकी एक कीटकनाशक – क्विनॉलफॉस 25 ए एफ प्रति 10लिटर पाणी 20 मि.ली प्रति हेक्टरी कीटकनाशकाचे प्रमाण – 1750- 2500 मि.ली, प्रोफेनोफॉस 50 ईसी – 20 मि.ली. 1500-2000 मि.ली. थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी 20 ग्रॅम. 1000 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 25 मि.ली. 1250-3750 मि.ली. डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के ईसी 10.मि.ली. 500 मि.ली.

दुस-या फवारणीसाठी यापैकी एक- क्लोरेंट्रॅनीलीप्रोल 9.3 टक्के + 5.मि.ली. 250 मि.ली, लँब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के झेडसी, डेल्टामेथ्रीन 1 टक्के + 10 ते 12 मि.ली. 1000-1250 मि.ली ट्रायझोफॉस 35 टक्के ईसी,

अघिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी अथवा टोल फ्री क्रमांक-1800 233 4000, वेबसाईट – www.krishi.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Previous Post

मका पीकावरील अमेरीकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

Next Post

पाचव्या मजल्यावरून उडी घेवून तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचव्या मजल्यावरून उडी घेवून तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon