तालुक्यात खळबळ ; आरोपीला अटक
जळगाव – जामनेर तालुक्यातील नांद्रा (प्र.लोहारा) येथे मोठ्या मुलांनी आपल्या वडिलांसह आपल्या लहान भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना
१२ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे . दरम्यान खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही . आनंदा कडू पाटील (६२) व भैय्या आनंदा पाटील अशी मृतांची नावे आहेत. निलेश आनंदा पाटील याने हे दोन्ही खून केले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
गावात नेहमी नेहमी भांडण का करतोस? अशी विचारणा करणाऱ्या वडिलांना व लहान भावाला मोठ्या भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना येथून जवळच असलेल्या नांद्रा (प्र.) लो.ता.जामनेर येथे दि.११रोजी रात्री घडल्याने नांद्रासह परिसरात एकच खळबळ उडाली.
नांद्रा(प्र.) लो.जामनेर येथील आनंदा कडू पाटील हे दोन्ही मुलांसह मोलमजुरी करून रहात होते. मोठा मुलगा निलेश आनंदा पाटील यास त्याचे वडील आनदा कडु पाटील व लहान भाऊ महेंद्र पाटील असे बोलले की तू गावात का नेहमी भाडण करतो याचे मोठा भाऊ निलेश यास वाईट वाटले व त्याने घरातुन चाकू आणाला व वडीलाना व लहान भाऊ अशाना पोटावर वार करून जिवेठार मारले असून पहुर पो स्टेला भाग 5 गुरन 201/20 भादवी क. 302 पमाणे गु्नहा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे . सदर घटनेचा पुढील तपास पहूर पो.स्टे.चे सहा.पो.निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.अमोल देवरे, स.फौ.अनिल अहिरे, पो.कॉ.ईश्वर देशमुख, शशिकांत पाटील हे करीत आहेत.