पुणे । राज्यातील (professional) आणि बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.








