चाळीसगाव तालुक्यतील पिलखोड येथील घटना ; एक गंभीर
चाळीसगाव;- काका पुतण्याचे भांडण सुरु असताना ते सोडवण्यास गेलेल्या व्यक्तीचाच खून झाल्याची घटना तालुक्यातील पिलखोड येथे घडली.
तालुक्यातील पिलखोड येथे काका व पुतण्यात कौटुंबिक वादातून भांडण सुरू होते. काका- पुतण्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेले गावातील व्यक्ती धोंडू सुपडु पाटील (वय-६२) हे गेले असता त्यांना हाणामारीत डोक्याला जबर मार लागून खून झाला . तर सचिन धोंडू पाटील (वय-२८) हा गंभीर जखमी झाला. जखमीस तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले .







