जळगाव— जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष नामदार नाना पटोले यांच्याशी जळगाव जिल्हा एन एस यू आयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी विविध मागण्यांवर चर्चा करून निवेदन दिले. याप्रसंगी ज्ञानेश्वर कोळी, मनोज सोनवणे, मनोज चौधरी, अमजद पठाण आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे कि , तसेच कोरोणा लढ्यातील मृत पावलेल्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स,पत्रकार व इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी वर्गाला “शहीद” म्हणून घोषित करावे नोकर भरती रद्दचा निर्णय तात्काळ मागे घ्या, आजी-माजी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्री यांचे अर्थव्यवस्था सुधारेपर्यंत मासिक मानधन बंद करण्यात यावे. जास्तीत जास्त दारूच्या दुकानांना अधिकृत मान्यता देऊन इतर राज्यांप्रमाणे दारू व नशेच्या इतर वस्तूंवर 75 टक्के कोवीड कर लागू करावा. आदी मागणी करण्यात आली आहे.