मेहेरगाव ता. .अमळनेर –— गावाच्या आर्थिक समृद्धी सोबत मनाची समृध्दी महत्वाची आहे.भांडायचे नाही तर मांडायची वृत्ती ठेवा.सज्जन शक्ती पुढे आली आणि अधिकारी पदाधिकारी यांनी हातात हात घेऊन गावाच्या विकासाचा संकल्प केला तर काय विकास घडू शकतो याचे उत्तम उदाहरण मेहेरगावने जिल्ह्यात निर्माण केले आहे. गावकऱ्यांना मोफत शुद्ध पाणी,मोफत दळणाची सोय, महिलांच्या नावाने डोअर नेम प्लेट तसेच पुरुषांपेक्षा महिलांचे जन्मदराचे अधिक प्रमाण तसेच शंभर टक्के व्यसनमुक्त गाव अशा अनेक उपक्रमातून मेहेरगावने आपले आगळेवेगळे पण जपले असून कृतिशील ध्येय असलेल्या गावकऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी.गावाच्या पुढील वाटचालीस जी मदत करता येईल ती करण्यासाठी सदैव तयार असून येत्या काळात मेहेरगाव जिल्ह्यात शाश्वत विकासाचे रोल मॉडेल ठरेल असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे .मेहेरगाव ता अमळनेर येथे आज हागणदारीमुक्त गाव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील ,भाजपा तालुका अध्यक्ष हीरालाल पाटील ,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजय पाटील ,माजी जि.प.सदस्य संदीप पाटील, जेष्ठ नेते जुलालआप्पा पाटील, गट विकास अधिकारी संदीप वायाळ,पाणी फाउंडेशनचे सुखदेव भोंसले, सुनील पाटील ,सहाय्यक जिला आरोग्य अधिकारी दिलीप पाटोडे, नाटेश्र्वर पाटील, सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी, पातोंडा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कुलकर्णी, डॉ. संदीप चौधरी, आदर्श मेहेरगाव सरपंच छायाताई पाटील, शरद पाटील, ग्रामसेवक अनिल सोनवणे ग्रामस्थ उपस्थित होते.
*मेहेरगाव विकासाचे रोल मॉडेल*
या गावात शुद्ध आर ओ पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था, मोफत पिठाची गिरणी,सुसज्ज अभ्यासिका ,व्यायामशाळा, गावातील रस्त्यांचे १००% काँक्रीटीकरण, संपूर्ण गावात एल डी दिव्यांची व्यवस्था, चौकाचौकात सी सी टी व्ही कॅमेरे ,डिजिटल अंगणवाडी, जी. प.शाळा, संपूर्ण गाव व्यसनमुक्त एवढेच नव्हे आता हे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त अशी अनेक वैशिष्ट्ये असलेली मेहेरगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यात आदर्श असून या गावातील विकासाची घौडदौड पाहण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच पदाधिकारी याचा लवकरच अभ्यास दौरा आयोजित करू अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलीयम आणि प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.
*खासदार उन्मेश दादांनी केली गावाची पाहणी*
सायंकाळी पाच वाजता मेहेरगाव येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आगमन झाले त्यांची वाजत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम स्वागत कमानी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. गावातील विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी गावाच्या प्रगतीची पाहणी केली.त्यांनी ठिकठिकाणी गावकऱ्यांशी संवाद साधला. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सरपंच छाया ताई पाटील,सरपंच पती शरद पाटील,ग्रामसेवक अनिल सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी गावाच्या विकासाचा प्रवास मांडला.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी तर आभार पाणी फाउंडेशनचे सुखदेव भोसले यांनी केले. श्रीमती लांडगे यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचा सत्कार खासदार उन्मेश दादा पाटील यांचे करण्यात आला. कार्यक्रमाला महिला व गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
*मेहेरगाव लवकरच राज्यभर चर्चेत*
मेहेरगाव येथील विकासाची गाथा आज प्रत्यक्ष पाहता आली. राज्यात आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरेबाजार,पाटोदा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मेहेरगावाने विकासाची वाटचाल सुरू ठेवली आहे. भविष्यात गावातील सर्व माता भगिनींचे बँक खाते उघडून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्व गावकऱ्यांची लवकरच मोफत नेत्र तपासणी करून चष्माचे वाटप करू.ज्यांना गरज असेल त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून हे गाव मोतिबिंदू मुक्त करू.असे सांगून ते म्हणाले की या गावाची यशोगाथा लवकरच राज्यभर पोहचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.