चाळीसगाव : टवाळकी करणा-यांना हटकल्याचा राग आल्याने तिघांनी एकास घातक शस्त्रांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना काल रात्री चाळीसगाव शहरात घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत वृत्त असे की विजय रामदास बोरसे हे लक्ष्मीनगर भागात राहतात. ते रहात असलेल्या अपार्टमेंटजवळ किरणसिंग पाटील व त्याचे इतर तिन साथीदार टवाळकी करत होते. याठिकाणी टवाळकी करु नका असे म्हणत विजय बोरसे यांनी सर्वांना हटकले. आपल्याला हटकल्याचा राग आल्याने किरणसिंग पाटील व त्याच्या इतर साथीदारांना राग आला.त्यांनी तलवार, चाकू, लाकडी दांड्याचा वापर करत विजय बोरसे यांना जखमी केले. जखमी विजय बोरसे यांना नातेवाईकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यांनी दिलेल्या खबरीनुसार आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिसात किरणसिंग पाटीलसह त्याच्या साथीदारांविरुद्ध भा.द.वि.307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक मयुर भामरे तपास करत आहेत.