सोशल डिस्टन्स गेले खड्ड्यात

यावल ;- शासनाने महसूल तूट लक्षात घेता मद्य दुकाने आज दिनांक 5 मे 2020 पासून उघडण्याचा निर्णय घेतल्याने यावल येथील सातोद रोडवर असलेले तसेच यावल परिसरात एकमेव असलेल्या अंबिका वाईन सेंटर दुकान आज आज दुपारी उघडण्यात आल्याने मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली.
अंबिका वाइन सेंटर मालकाने मद्यपी ग्राहकांची मोठी गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टन्स बाबत गांभीर्य लक्षात न घेतल्याने तसेच त्याबाबत तशी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्स खड्ड्यात घालून मोठी गर्दी केली, अंबिका वाईन सेंटर मधील एका कर्मचाऱ्याने भर गर्दीत ग्राहक रांगेत उभे असताना आपल्या काही खास ओळखीच्या ग्राहकांना रांगे व्यतिरिक्त देशी विदेशी दारू घेणाऱ्या ग्राहकांना आत सोडल्याने ग्राहकांनी मोठी आरडाओरड केली,
तरी अंबिका वाइन सेंटर मालकाने आपल्या त्या एका कर्मचाऱ्यांवर विश्वास न ठेवता मद्यपी यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता रांगेत उभे असणाऱ्या ग्राहकांनाच आत प्रवेश करण्याची कार्यवाही करावी तसेच ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स कसे राखले जाईल याबाबत दक्षता बाळगावी तसेच अंबिका वाईन सेंटर जवळ कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रांगेत उभे असणाऱ्या मद्यपी ग्राहकांना देशी विदेशी दारूचा माल दिला गेला पाहिजे याबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकां व्यतिरिक्त इतर कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला देशी विदेशी दारू विक्री करू नये असे सपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. घडल्यास कोण जबाबदार राहील याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







