अमळनेर ;- शहराचा वर्षभरापुर्वी जीर्ण झालेला पुरातन गाव दरवाजा अतिवृष्टीमुळे ढासळला असतांनां त्याला तात्पुरत्या स्वरुपात गोण्या लावणेत आलेल्या होत्या. आमदार म्हणुन निवडुन आलेनंतर नाशिक विभागीय बैठकीत मुख्यमंत्री ना.ऊध्दवठाकरे यांचेकडेआमदार अनिलपाटील यांनी हा प्रश्न व बाब निदर्शनास आणुन देऊन निधीची मागणी मंजुर करुन घेतली होती. परंतु लालफीतीच्या कारभारामुळे व कोरोना प्रादुर्भावामुळे दरवाजा दुरुस्तीची प्रक्रीया थांबली!दरम्यान दरवाज्यास (वेस)ला लावलेल्या मुरुमाच्या गोण्या नुकत्याच रात्रीला जीर्ण झालेमुळे ढासळल्याने वहातुकीची मोठी समस्यासह जीवित- वित्तहानी होणेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे!नागरीकातही भितीचे वातावरण पसरले आहे.
सदर दरवाज्याचे अवलोकन केले असता,दरवाज्याच्या आतील दगडी कमानीलाही तडा गेला असलेने,पुरातन व शहराची अस्मिता टीकवणेसाठी दरवाज्याचे दोन्ही जीर्ण बुरुज काढुन टाकुन त्याठीकाणी नविन वेसचे बांधकाम करणेत यावे. यासाठी शासनाच्या अनुदानाची वाट न पहाता आजी माजी आमदारांनी पुढाकार घेऊन नगरपरीषद आणि लोकवर्गणीतुन सदर दरवाज्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावेअशी मागणी रामभाऊ संदानशिव,अध्यक्ष,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परीषद यान्च्यक्दुन करण्यात आली आहे .