जळगाव ;– बुलढाणा येथील डॉ. राजपूत यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यांच्याकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. याबाबत जळगावातील प्रसिद्ध डॉक्टर रवी महाजन यांचा सोशल मीडियावर खुलासाप्रसिद्ध झाला असून हा खुलासा त्यांच्याचशब्दात …. !
मी डॉक्टर रवी महाजन जळगाव येथे महाजन हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली तीस वर्षे वैद्यकीय सेवा देत आहे. यावर्षी कोरोना चे जागतिक संकट आल्यावर जसलीन इंडो सर्जिकल चे उमेश सोनार व आम्ही दोघांनी कोरोना चा सामना करण्यासाठी डॉक्टर्स ,आरोग्य सेवक व प्रशासनातील व्यक्तींना उपयोगात येईल असे जसलीन फेस प्रोटेक्टर डिझाईन केले व ते सर्वांना बनवता यावे यासाठी त्याचे तंत्रज्ञान व्हिडिओच्या द्वारे आम्ही प्रसारित केले ,उद्देश हा होता की या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान जाऊन त्यांनाही हे बनवता यायला हवे व समाजासाठी त्याचा उपयोग व्हावा असा होता . या फेस प्रोटेक्टर ची उपयुक्तता लक्षात घेऊन डॉक्टर्स व अनेक लोकांकडून त्याची मागणी येऊ लागली .,त्याच काळात आर्यन इको रिसॉर्ट येथे काही दिवसांपूर्वीच सातपुड्यात कामासाठी आलेले आदिवासी बांधव
लॉकडाउन मुळे तेथेच अडकले होते ,त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी व वैद्यकीय सेवा आम्ही पूरवत होतोच पण या श्रमजीवी लोकांच्या हाताला काम नव्हते ,बेरोजगारीच्या संकटात अडकलेल्या या सर्व आदिवासी बांधवांना आम्ही फेस प्रोटेक्टर बनवण्याचे प्रशिक्षण दिले ,त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांना चांगला रोजगार मिळाला व स्वकष्टाने कमाई करून स्वाभिमानाने जगण्याचा आनंद त्यांना या फेस प्रोटेक्टर च्या निर्मितीतून मिळाला होता . ट्रांसपोर्टेशन च्या अनंत अडचणी असून देखील टॅक्सेस भरून बुलढाणा आय एम ए ची लेखी ऑर्डर आल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून फेस प्रोटेक्टर वाहनाने घरपोच पोहोचवले. त्यानंतर काही दिवसांनी समाजातल्या प्रतिष्ठित व जेष्ठ डॉक्टरांनी आमची बदनामी व चुकीचा प्रचार व प्रसार सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करणे सुरू केले व आमचे हे काम म्हणजे पैसे कमावण्याचा आमचा हेतू असून, किमतीबद्दल ही त्यांनी गैरसमजापोटी काही आरोप केलेले आहेत. या दोन गोष्टींचे स्पष्टीकरण पूढे देत आहे हे बनवण्याचा आमचा उद्देश म्हणजे ज्यांच्या हाताला काम नव्हते त्या आदिवासी बांधवांना काम देणे व त्याच्या विक्रीतून आलेल्या पैसा आदिवासी बांधवांच्या दैनंदिन उपजीविकेसाठी खर्च करणे असा आहे व तो केला जात आहे .या फेस प्रोटेक्टर ची किंमत ठरवताना हि *मटेरियल ओरिएंटेड नव्हती तर लेबर ओरिएंटेड होती . सणावाराला एखाद्या सामाजिक संस्थेने बनवलेल्या पणत्या, मेणबत्त्या दिवे किंवा कुठल्याही वस्तूंचे मूल्य आपण पैशात करत नाही , त्यामागे वेगळ्या भावना असतात त्याच भावनेतून आदिवासींच्या या श्रमाला आम्ही मूल्य देत आहोत व त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो आहे. या कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. यात खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सना व जे मूल्य देऊ शकतात त्यांना योग्य त्या किमतीत आम्ही फेस प्रोटेक्टर दिलेले आहेत .परंतु जवळजवळ वीस टक्के फेस प्रोटेक्टर जी लोक आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र , निशुल्क सेवा जनतेला देत आहेत असे सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य सेवक, प्रशासनातील कर्मचारी व सामाजिक संस्था यांना आम्ही ते विनामूल्य देत आहोत. आपण या सगळ्या आदिवासी बांधव करीत असलेल्या कामाचे मूल्य चुकीच्या पद्धतीने करीत असल्याने व पैसा कमावणे हा यामागचा आमचा उद्देश आहे हा आरोप केल्याने आम्हाला स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे असे वाटले . मला आपणा सर्वांना आवाहन करायचे आहे की बुलढाणा आय एम ए यांच्यासोबत अतिशय पारदर्शक व लेखी व्यवहार असतानाही डॉक्टर राजपूत यांच्याकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे ,आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देत आहोत तरी आमच्या सर्व हितचिंतकांना नम्र विनंती करतो या बाबतीत कुठलाही गैरसमज करू नये , कायदेशीर प्रक्रिया करीत आहोतच, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे ,कृपया आमच्यावर विश्वास व प्रेम तसेच ठेवावे ही नम्र विनंती
महाजन परिवार