जळगाव –जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आज अमळनेर येथे आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ झाली आहे.या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये ४ पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष २७ व २८ वर्षीय तर महिला ३६ वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.