अमळनेर ( प्रतिनिधी ) ;- अमळनेर तालुका काँग्रेसच्यावतीने आज रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महिला सुलोचनाताई वाघ ,किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील, धनगर आण्णा पाटील, सुभाष जीभाऊ पाटील, जयवंत पाटील, मुन्ना शर्मा, प्रवीण जैन,अलीम मुजावर,रजाक दादा,बिस्मिल्ला बागवान,संतोष बहाद्दरवाडीकर,प्रसाद शर्मा,टिल्लू भंडारी,मनोज सोनार,कृष्णा शर्मा,आदी उपस्थित होते. नंतर ग्राम पंचायत निवडणूक पॅनल विजयी झाल्याबद्दल खवशीचे डॉ. शाम देशमुख व शिरूडचे प्रा,सुभाष जीभाऊ यांचा सत्कार करण्यात आला.