गावात निर्जंतुक फवारणी
सामनेर ता.पाचोरा ;– येथे 21 रोजी सामनेर येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे सदर व्यक्ती ही गावातील दशक्रिया विधीला उपस्थित दिली होती. पाच दिवसापूर्वी त्यांना तापाची लक्षणे दिसू लागली . त्यांनी गावातील स्थानिक डॉक्टर यांना दाखवले. लगेच त्यांनी जळगांव येथे खाजगी दवाखान्यात तपासणी केली असता त्यांना न्यूमोनियाची लक्षण दिसून आले . त्यानंतर त्यांना नाशिक येथे खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. तिथून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . आज रोजी वैद्यकीय आधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सयासे,आरोग्य सेवक घनश्याम लोखंडे, एन् एम चौधरी, कैलास शिरसाठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुधीर सोंकुळ,प्रशांत कोळी ,यांनी भेट देऊन रुग्णाचा एरिया पूर्ण शील करून संपूर्ण परिसर फवारणी करण्यात आली.







