जळगाव ;- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना सारख्या भयंकर आजाराने थैमान घातले आहे व कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात दोन हजाराच्या पार झाली आहे . शहरातील फळविक्रेते ,हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्याकडून अतिआवश्यक वस्तूंची हात विक्री होत असताना कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टिंग न पाळता अत्यावश्यक वस्तूंची विक्री होत आहे . त्यामुळे आज अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली . शहरातील गणेश कॉलनी खाजमिया दर्ग्याजवळ फुल विक्रेते व फळ विक्रेता व छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई केली आहे .







