जळगाव (प्रतिनिधी)- एका दहावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीला छेडणार्या रोडरोमीओच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तांबापुर येथील इच्छादेवी मंदिरामागे राहणारा अमृत उर्फ आबा सखाराम वाणी हा 16 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शामाफायरजवळ त्याच्या घराजवळ बसलेला होता. यावेळी ती अल्पवयीन मुलगी जात असतांना त्याने तिला जोरात आय लव यु म्हटले. तसेच बळजबरीने हात पकडला व लज्जा उत्पन्न होईल, असा प्रकार केला. त्यामुळे पीडीत मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आबा वाणी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनंदा पाटील करीत आहेत.