जळ्गाव ;- जनमत प्रतिष्ठानतर्फे शीतल जडे यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. संस्थाध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने तंट्या भील वस्तीत अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदानाचा कार्यक्रमही घेण्यात आला. या वेळी नाथ फाउंडेशनचे अशोक लाडवंजारी, बजरंग दलाचे दीपक दाभाडे, धनगर समाज शहरप्रमुख उमेश धनगर, हर्षाली पाटील, गणेश जोशी आदी उपस्थित होते. जडे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल व पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष संजय वाघ, मुख्याध्यापक एल. एच. शिंपी यांनी गौरव केला आहे.