शहर पोलिसांची कारवाई ; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव शहरातून विविध भागांमधून महागड्या सायकली चोरणारा सराईत चोरट्याला शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली असून आरोपीकडून १८ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश दौलत साबळे (वय-४२) रा. खडका रोड, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण यांचे पथक गस्त घालत असताना आरोपी गणेश साबळे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली असता त्याने विविध भागातून सायकल चोरी केल्याचे काबुल करून १८ सायकली काढून दिल्या. त्याच्याकडून सायकलींच्या विविध चाव्या आढळून आल्या असून तो याद्वारे सायकल चोरत असल्याचे समजते . पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, योगेश इंधाटे, संजय झाल्टे यांनी केली आहे.