रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांची प्रार्थना
जळगाव ;- कोरोना एक साथीचा रोग असल्यास, त्यापासून मुक्त कर,एखादा आजार असल्यास त्यावर उपचार आणि औषधोपचाराचे मार्गदर्शन कर व कोरोना जर काही षडयंत्र असेल तर ते उघड कर आणि या सर्व मानवतेला कोरोना पासून तूच वाचवू शकतो म्हणून तूच आमचे संरक्षण कर अशी अंतर्मुख प्रार्थना आज सर्व दूर करण्यात आली. ईदची नमाज घरी, काही प्रमाणात मस्जिद व ईद गाह मध्ये मर्यादित संख्येत करण्यात आली त्यात ही प्रार्थना करण्यात आली.
रमजान ईद व अक्षयतृतीया एकाच दिवशी असल्याने महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील,जिल्हा अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे,आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एम आय डी सी चे पो नी प्रतापसिंग शिकारे यांनी उपस्थिती दिली असता त्यांचे विधिवत स्वागत ईद गाह ट्रस्ट तर्फे गफ्फार मलिक,फारूक शेख,अश्फाक बागवान,ताहेर शेख, अनिस शाह,जाफर शेख, ऍड आमीर शेख यांनी केले. हाजी गफ्फार मलिक यांनी ट्रस्टचा आढावा सादर केला
सर्व प्रमुख अतिथींनी ईदच्या शुभेच्या देऊन मार्गदर्शन केले. प्रामुख्याने चंद्रकांत गवळी, सतीश कुलकर्णी,डॉ प्रवीण मुंडे,अभिजित राऊत व जयश्री महाजन यांचा समावेश होता.
कोरोना काळात कब्रस्थान चे कार्याची माहिती ,आकडे मोड, जन्म संख्या, मृत्युदर व जळगाव चा विस्तारा बाबत ची माहिती सचिव फारूक शेख यांनी मांडुन शासना कडे दोन्ही बाजूला कब्रस्थान ची मागणी केली असता त्यास आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी होकार दिला तर जिल्हा अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करण्याचे सांगून ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक केले.
अनिस शाहचे विशेष कौतुक
कोरोनात मृत्यू पावलेल्यांचा दफन विधी चोख पार पडल्याबाबत ट्रस्टचे सह सहचिव अनिस शाह यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुफ्ती हारून यांनी तर सूत्र संचलन व आभार फारूक शेख यांनी व्यक्त केले.