नशिराबाद ;– न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी व बारावीत प्रथम, द्वितीय,आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन माळी हे होते. संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर जी चौबे, संचालिका प्रमिला महाजन, संचालक राजेश पाटील, विनायक वाणी उपस्थित होते.
संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून व अन्य दानशूर व्यक्तींनी दिलेल्या रोख रकमेतून विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी प्रा. व्ही. बी. कोष्टी व कलाशिक्षक श्याम कुमावत यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एम. डी. तायडे, उपमुख्याध्यापक सी. बी. अहिरे, पर्यवेक्षक बी. आर. खंडारे उपस्थित होते. एस. बी. रत्नपारखे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एल. पाचपांडे, आर. के. जोशी, टी. टी. सोनवणे यांचे सहकार्य लाभले.