जळगाव(प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे आज दुपारी इंदिरा नगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी पंडित सुन्ने (बारी ) वय ३२ रा. इंदिरानगर शिरसोली असे मयत तरुणाचे नाव आहे.


याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शिवाजी पंडित सुन्ने (बारी ) वय ३२ रा. इंदिरानगर या तरुणाने आज दुपारी घराच्या छताच्या कडीला साडी अडकवून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून त्याला शिरसोली प्र. न. येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले . वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मृत घोषित केले . डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय विशाल सोनवणे करीत असून मयत तरुणाच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याघटनेमुळे गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.







