माजी मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप
जळगावः कोरोना’ रुग्णांचे स्वॅबचे रिपोर्ट येण्यास तीन ते सात दिवसांचा वेळ लागत असल्याने कोरोनाला बाधितांची संख्या जळगाव नाही मालेगावसह वाढत असल्याचा आरोप माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला .
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील,माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी, आ. मंगेश चव्हाण ,आ. संजय सावकारे ,आ. स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. महाजन म्हणाले कि , कोरोना बाधितांच्या अंत्ययात्रेत अनेकजण आल्याने कोरोनाची लागण होत असल्याने मोजक्या नातेवाईकांना अंत्यविधीला प्रवेश दयावा असेही ते यावेळी म्हणाले . सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या शेती मालाला चांगला हमीभाव मिळत नसून केंद्र उभारले जात नाही . मात्र खरेदीची व्यवस्था केली जात नाही .
शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालविली असल्याचे आ. महाजन यांनी सांगितले. ‘डीन’ची बदली केलीच कशी जोपर्यंत दुसरा डीन रुजू होत नाही तोपर्यंत. रुग्णांच्या जिवाशी खेळ चालविला शासनाने चालविला असल्याचा आरोप यावेळी बोलताना केला .