एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव ;– दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, मित्रांनी शुटींग करुन केले व्हीडीओ, खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयीताचे न्यायालया बाहेर तयार करून मुजोरी अन् भाईगिरी दाखविणारे दोन टिकटॉक व्हीडीओ” वरुन तीन जणांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून याप्रकरणी एकूण 11जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत माहिती अशी कि अमोल सोनवणे हा गेल्या आठ महिन्यांपासून कारागृहात आहे. त्याला कारागृहाबाहेर आणि न्यायालयात आणतानाचे व्हिडीओ त्याच्या भावासह मित्रांनी तयार करून सोशल मीडियावर टाकले होते . या प्रकरणची दाखल पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव
उगले यांनी घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना वरील शुटींग बाबत सखोल चौकशी करुन गुन्हा
दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नरवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन
याचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षकबापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ.शरद भालेराव,
रामकुष्ण पाटील , जितेंद्र पाटील ,अशरफ शेख,सुधाकर आंभोरे, अनिल देशमुख, दर्शन ढाकणे, महेश पाटील, नितीन
चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी तसेच तांत्रिक माहिती उपलब्ध करणे करीता पोलीस उपनिरीक्षक श्री.अंगत नेमाणे
पोहेकॉ.विजय पाटील, दिनेश बडगुजर , नरेंद्र वारुळे यांना जळगाव शहरात गोपनिय माहिती काढणे कामी रवाना केले होते.
वरील पथकाने TikTok id ३०२ AmolBhai यावर एमआयडीसी पो.स्टे. कडील IPC ३०२ मधिल अटकेतील
आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) याचा मोठा भाऊ अरुण नाना सोनवणे (मराठे), रा.रामेश्वर कॉलनी मेहरुण जळगाव यांने
त्याचा भाऊ आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) यास न्यायालयात हजर करुन झाले नंतर मा.न्यायालय जळगाव यांचे
आवाराचे बाहेर रोडने कारागृह जळगाव येथे घेवुन जात असतांना व आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) यांचे फोटोचे Tik
Tok व्हीडीओ बनवले आहे असे निष्पन्न केले.
वरील पथकाने Tik Tok व्हीडीओ बाबत विचारपुस केली असता अरुण नाना सोनवणे (मराठे) याने सांगीतले की,
मी माझे Tik Tok id @arun sonvane ००७ व शुभम उर्फ कोयता शेखर पाटील याचे Tik Tok id @shubham patil
८३५५ या वरुन माझा भाऊ आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) यास मा.न्यायालयात हजर करुन झाले नंतर मा.न्यायालय
जळगाव यांचे आवाराचे बाहेर रोडने कारागृह जळगाव येथे घेवुन जात असतांना ००:५९ सेकंदाचा “मुन्ना झुंड मे तो सुवर आते
है, शेर अकेला आता है आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो शेरो का मैहु शेर यारो अरे कोई ना मुजसे
दलेर यारो शेरो का मैहु शेर यारो अरे कोई ना मुजसे दलेर यारो सच सच केहता हू मै दटके रेहता मे आया है राजा लोगो रे लोगो
राजा के संग संग झुमलो झुमलो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो डी.जे.मॅक्स डर क्या है रे धम
धम धमाके से नाचोरे” या गाण्यावर व्हीडीओ हा विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन ) याचे Tik Tok आयडी वरुन आनंद हरी
पाटील याने शुटींग केला आहे. तसेच भाऊ आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) याचे फोटोचा Tik Tok id
@user२९०७६५६१९८७६४६ यावर “गुन्हा करायचा तर चार चौघात करा लपुन छपुन भुरटे मारतात भाई लोग नाही, वाह
वा.. बर दोन जिथे गुन्हा कराल तिथुन थेट पोलीस चौकीत हजर व्हायचे पोलीस चौकी इतकी सेफ दुसरी जागाच नाही हा.. हा..
हा.. आणि नंबर तीन तो सगळयात महत्वाचा म्हणजे मारायचा तर सगळयात टॉप. ” या डायलॉग वर ३०२ AMOL BHAI
हे नाव टाकुन व्हीडीओ बनविला आहे. तसेच सदरचे दोन्ही व्हीडीओ मी बनविलेला ००७ या नावाचे व्हॉटसअॅप ग्रुप वर टाकले
होते.
आरोपी १) अरुण नाना सोनवणे (मराठे), वय २२, रा.रामेश्वर कॉलनी मेहरुण जळगाव, २) आनंद हरी पाटील, वय
१८, रा.खेडी ता.जि.जळगाव, ३) विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन ) ४) दिपक रमेश हटकर, वय २२, रा.इंदिरा नगर, खेडी
ता.जि.जळगाव, ५) ईश्वर अशोक राऊत, वय २१, रा.ममता हॉस्पीटल जवळ मेहरुण जळगाव ६) अरुणाबाई नाना सोनवणे
(मराठे), वय ५० रा.रामेश्वर कॉलनी जळगाव यांनी एकत्र येवुन एमआयडीसी पो.स्टे. कडील भाग ५ गुरनं ६६७/२०१९ IPC
३०२ मधिल आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) यास मा.न्यायालय जळगाव यांचे आवाराचे बाहेर रोडवरुन मा.न्यायालयातुनकारागृहात हजर करीत असतांना अरुण नाना सोनवणे (मराठे) याचे Tik Tok id @arun sonvane ००७ व विधीसंघर्ष बालक
(अल्पवयीन ) याचे Tik Tok id @shubham patil ८३५५ यावरुन आनंद हरी पाटील याने शुटींग केला आहे. व अमोल नाना
सोनवणे (मराठे) याचे फोटो एकत्र करुन Tik Tok id @user२९०७६५६१९८७६४६ वर व्हीडीओ बनवुन तो ००७ या व्हॉटस
अॅप ग्रुप मध्ये टाकुन सदरचा व्हीडीओ हा इतर पाच इसमांनी सदरचा व्हीडीओ प्रसारीत केला. तरी यासर्वानी संगणमत करुन
एमआयडीसी पो.स्टे. कडील भाग ५ गुरनं ६६७/२०१९ IPC ३०२ मधिल आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) याचा व्हीडीओ
बनवुन तो Tik Tok व व्हॉटस अॅपवर या समाज माध्यमांवर प्रसारीत करुन सार्वजनिक प्रशांततेविरुध्द अपराध करण्यास प्रवृत्त
होईल असे कृत्य केले आहे.
एमआयडीसी पो.स्टे, भाग ५ गुरनं ६६७/२०१९ भादवि ३०२ या गुन्हयातील फिर्यादी, साक्षीदार, जनतेच्या व समाजाच्या
मनात भिती निर्माण करुन वर्गावर्गात व समाजामध्ये शत्रुत्व वाढविणारी विधाने TikTok व्हीडीओ तयार करुन व्हॉटसअॅप ००७
ग्रुप मध्ये प्रसारीत केली आहेत. असे समजण्यास प्रबळ कारण आहे की, एमआयडीसी पो.स्टे. कडील भाग ५ गुरनं ६६७/२०१९
IPC ३०२ मधिल अटक व न्यायालयीन कोठडतील आरोपी अमोल नाना सोनवणे (मराठे) गंभीर गुन्ह्यात अटक आहे हे माहिती
असुन त्याचे गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करुन प्रक्षोभक Tik Tok व्हीडीओ व्हॉटसअॅप चे ००७ या ग्रुप मध्ये या सोशल
मिडीयावर प्रसारीत केला. सदर आरोपीतांचे दहशतीमुळे समाजातील व्यक्ती त्यांचे विरुध्द तक्रार देण्यास धजावत नाही अशी
गोपनीय माहिती मिळाली आहे. १) अरुण नाना सोनवणे (मराठे), वय २२, रा.रामेश्वर कॉलनी मेहरुण जळगाव, २) आनंद हरी
पाटील, वय १८, रा.खेडी ता.जि.जळगाव, ३ विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन ), ४) दिपक रमेश हटकर, वय २२, रा.इंदिरा नगर,
खेडी ता.जि.जळगाव, ५) ईश्वर अशोक राऊत, वय २१, रा.ममता हॉस्पीटल जवळ मेहरुण जळगाव ६) अरुणाबाई नाना सोनवणे
(मराठे), वय ५० रा.रामेश्वर कॉलनी जळगाव, ७) आकाश कोलते, ८) योगेश घोलप, ९) सुरज नेवे, १०) सुरज सोनवणे, ११)
नंदकिशोर सत्यजीत खारे, १२) Tik Tok id @user२९०७६५६१९८७६४६ धारक याचे विरुध्द भादवि कलम ५०५
(१)(ब),५०५ (२), ५०४,५०६,३४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
आरोपी १) अरुण नाना सोनवणे (मराठे), वय २२, रा.रामेश्वर कॉलनी मेहरुण ठगाव, २) आनंद हरी पाटील, वय १८,
रा.खेडी ता.जि.जळगाव, ३) विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन ) ४) दिपक रमेश हटकर, वय २२, रा.इंदिरा नगर, खेडी
ता.जि.जळगाव, ५) ईश्वर अशोक राऊत, वय २१, रा.ममता हॉस्पीटल जवळ मेहरुण जळगाव यांना स्थानिक गुन्हे शाखेकडील
ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की
कोणीही समाजात तेढ निर्माण करणा-या पोस्ट्स, अफवा ,WhatsApp ,Tik Tok, Face Book, सारख्या इतर अॅपव्दारे
पसरविणा-या विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात सोशल मिडीयावर प्रक्षोभक पोस्ट / वक्तव्ये
करणा-यावर जळगाव जिल्हा पोलीस दल लक्ष ठेवून आहे.
आपणास जर अशा पध्दतीच्या पोस्ट , ऑडिओ , व्हीडीओ , मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या
त्वरील डिलीट कराव्यात व अशा पोस्टे बद्दलची माहीती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन , कंट्रोल रुम यांना
कळवावी, अफवांवर विश्वास ठेवु नये.असे आवाहन करण्यात आले आहे .