जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, द्वारा जळगाव शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यातील काही विद्यार्थी कोरोना महामारीच्या या संकट काळात काही कारणास्तव आपल्या गावी न जाऊ शकल्यामुळे त्यांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यातील मोठ्याप्रमाणात विद्यार्थी हे रूम करून राहतात व त्यांची खानावळ बंद झाल्याने जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. अशा शहरातील ६० गरजू कुटुंबांना व विद्यार्थ्यांना अभाविपच्या जळगाव शाखेच्या वतीने शिधा किटचे वाटप केले. यामध्ये बिहार, छत्तीसगड, राज्यस्थान राज्यातील विद्यार्थी शहरातच अडकले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अभाविप महाराष्ट्रद्वारे जाहीर केलेल्या हेल्पलाईन नंबर वरून महानगरमंत्री रितेश चौधरी यांना फोनद्वारे संपर्क केल्यानंतर त्यांना शिधा किट उपलब्धकरून देण्यात आल्या. या कार्यात अभाविप प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, हर्षल तांबट, मानस शर्मा या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.