जळगाव ;- डॉ . एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशचे मिशन करुणा अंतर्गत भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांच्यातर्फे सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला असून कोरोना संकटानंतर भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना चे अध्यक्ष हितेश पाटील यांचा सत्कार कुटुंबियांचे उपस्थित केला जाईल. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जिल्हा जळगावयांना डिजिटल प्रमाण पत्र देण्यात आले आहे. काही क्षण समाजासाठी ,काही क्षण देशासाठी असा नारा देत जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांच्या नेतृत्वात गरीब गरजू लोकांना अन्न.दान व गरजूंना धान्य , तेल , साखर , सर्व सामान वाटप आज करण्यात आले .
भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या कार्याची दाखल डॉ . एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे घेण्यात आली आहे . . आज असोदा ,सुप्रीम कॉलनी व कासम वाडी येथे वाटप करण्यात आले. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना तर्फे गोरगरिबांना सध्या दररोज जेवण वाटप करण्यात येत आहे एकुण 250 ते 300 नागरिकांना जेवण शिस्तबद्ध रित्या वितरण करण्यात आले. सध्या सर्वत्र लाँकडाऊन असल्याने शहरात विविध भागात जाऊन भारतीय वाहन खरेदी विक्री संघटने ने अन्नदानाचा कार्यक्रम केला.
यावेळी संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष हितेश पाटिल, शहर अध्यक्ष हर्षल मावळे, जिल्हा उप अध्यक्ष अजय पाटिल ,जिल्हा सचिव रुपेश अजमेरा ,जिल्हा खजिनदार राकेश पांडे ,जिल्हा कार्य अध्यक्ष अमिन शेख, जिल्हा संघटक प्रमुख मनोज पाटिल ,जिल्हा संपर्कप्रमुख हारुनभाई पठाण, शहर उप अध्यक्ष इम्रान पिंजारी ,शहर कार्य अध्यक्ष सिध्दीक खाटिक,,शहर संपर्क प्रमुख नकुल भदादे, तसेच संघटनेचे सभासद फिरोजभाई, रवि जाधव ,महेश कोळी,असिफ पटेल , किरण दुसाने आदी उपस्थित होते.