एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव ;- सध्या राज्यात संचारबंदी लागू असून संचारबंदीच्या काळात मुक्त संचार करणाऱ्या ७ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना शहरात संचार करण्यास बंदी आहे. असे असतांना एमआयडीसी हद्दीत सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्यावर संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित मयूर दगडू सोनवणे (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, बाळू सिताराम धनगर (वय-५२) रा. सुप्रिम कॉलनी, दगडू पंढरीनाथ घुगे (वय-५०) रा. जोशीवाडा, मेहरूण, प्रमोद सुपडू घुगे (वय-४७) रा. सुप्रिम कॉलनी, जितेंद्र अण्णा टिळंगे (वय-२४) रा. जाखनी नगर, कंजरवाडा, उमेश पंढरीनाथ अहिरे (वय-२१) रा. पंचमुखी हुनमान मंदीराजवळ, लाठी शाळेजवळ, ईश्वर बहारूमल मेथनी (वय-५४) रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी यांच्यावर पोहेकॉ मुद्दस्सर काझी यांच्या फियादीवरून सात जणांविरोधात जमावबंदी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोउनि विशाल सोनवणे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, पो.कॉ. प्रविण मांडोळे, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, असिम तडवी, मुदस्स काझी, इम्रान अली सैय्यद, लुकमान तडवी यांनी ही कारवाई केली.