जळगाव ;- मू. जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अॅण्ड नॅचरोपॅथी विभागात बुद्धपौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे पुण्यतिथी निमित्त ऑनलाइन ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्राचे संचालक डॉ. देवानंद सोनार हे मार्गदर्शन करीत आहे. बुधवारपर्यत ही कार्यशाळा सुरु राहणार आहे. ८१ जणांनी सहभाग नोंदवला आहे. सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अॅण्ड नॅचरोपॅथीचेा समन्वयक प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. पंकज खाजबागे हे नियोजन करीत आहेत.








