जळगाव (प्रतिनिधी ) ;- आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांना रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृखाली निमा-सीएमओ फोरमचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बी.ए.एम.एस. गट-अ. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये व कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात मा.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली निमा-कॉन्ट्रैक्चुअल मेडीकल ऑफीसर फोरमचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर व संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावळी रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी सदरील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला कोरोना काळात सेवा दिलेली आहे, त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये व त्यांच्यावर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी मा.राजेशजी टोपे यांना केली.
त्यानुसार टोपेयांनी निवेदनाचा पुर्णपणे अभ्यास करुन ब्रीफींग करावे व पुढील कार्यवाही संदर्भात संबधितांना अवगत करावे असे सांगितले.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, पांडुरग नाफडे आदि उपस्थित होते.