जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास हद्दीत सर्रासपणे सुरु असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्थ करून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . तसेच १ लाख ३२ हजारांचे रसायनयुक्त दारू यावेळी नष्ट करण्यात आली.
सिंगापूर, कंजरवाडा, जाखनी नगर कंजरवाडा आदी ठिकाणी अवैध दारु बनविण्यात येत होती .राखी राजू गुमाने, रेखा सूर्यभान कंजर, आशा सुनील बाटूगे, रीना धर्म गुमाने, बिजनाबाई राजू बाटूगे सर्व रा.जाखनी नगर जळगाव, यांना अटक करून त्यांच्याकडील दारूचे रसायन आदी नष्ट करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सपोनि अमोल मोरे, पो.उप निरीक्षक विशाल वाठोरे, रामकृष पाटील, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पोहेका राजेंद्र सैदाणे, पोना गणेश शिरसाळे, सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, किशोर पाटील, सतीश गर्जे, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, निलोफर सैय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाळ आदींनी केली .