जळगाव;- भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार आयएएस तृप्ती अंकुश धोडमिसे यांची जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १ फेब्रुवारी २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून जळगावच्या उपविभागीय अधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे. त्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी आदेश दिले आहेत.








