जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर असलेल्या शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणार्या दुकानाच्या ओट्यावर आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या तरूणाचा घातपाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी येथून जाणार्या काही जणांना हा मृतदेह दिसल्याने त्यांनी या संदर्भात शहर पोलीस स्थानकात याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.