यावल –आजाराला कंटाळून पती पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी यावल येथे उघडकीस आली असून यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , येथील भुसार धान्याचे व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुंजू दिगंबर पाटील यावल यांचे बंधू भागवत दिगंबर पाटील (वय 60) यांनी त्यांची पत्नी सौ विमल भागवत पाटील (वय 55) राहणार यावल यांनी आजाराला कंटाळून फैजपुर रोडवरील कॉलेजच्या समोर असलेले निर्मल नथू चोपडे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पती पत्नी हे हे आजाराला ग्रासलेले होते त्यांच्या पश्चात दोन मुली जावई असा परिवार आहे . सदरची घटना १७ जून बुधवार रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. विहिरीजवळ वरती त्यांचे चपला पडलेल्या आढळून आल्या . त्यानुसार त्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पोलिस स्टेशनला ही घटना कळविण्यात आली आणि येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे आणि पीएसआय खांडबहाले व सहकारी यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली.
विहिर २०० फूट असून चाळीस फुटाच्या वर पाणी असल्यामुळे चितोडा येथील पट्टीचे पोहणारे बाबुराव किनगे यांना बोलावण्यात आले . त्यांनी मयत विमलबाई भागवत पाटील यांचा मृतदेह वरती काढला.
मात्र भागवत ऊर्फ बाळू पाटील यांचा मृतदेह सापडत नव्हता. त्यासाठी मारूळ येथून पट्टीच्या होणाऱ्या ला आणून उतरवले आहे सदर मृतदेह दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत आला नव्हता. शोधकार्य सुरू आहे.