जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून जळगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे . आज दुपारी ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असताना आणखी नव्याने १२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत . त्यामुळे रुग्ण संख्या हि ९५७ झाली आहे.जामनेर २,चोपडा ३, जळगाव २, धरणगाव १, यावल १ , भुसावळ ३ असे एकूण १२ रुग्ण आढळल्याची माहिती विश्व्सनीय सूत्रांनी दिली आहे . आतापर्यंत ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२९ जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.