धुळे;- अन्वर नाला परिसरात पत्रटी गोडावून मध्ये मोहाडी पोलिसांनी छापा टाकून 25 किलो गांजासह 1मोटरसायकल,1आरोपी ताब्यात घेतला.
देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना काही जण नाल्या किनारी गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू करत आहे.अशी गोपनीय माहिती खबरी मार्फत मोहाडी पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी संगिता राऊत यांना मिळाली.त्यांनी पोलीस पथक तयार करून सुरत नागपूर महामार्गावरील पोरोळा रोड लगत असलेल्या अन्वर नाल्या जवळ काटेरी झुडपात असलेल्या पत्रटी गोडावून मध्ये छापा टाकला.यावेळी तेथून पळून जाणाऱ्या एका व्यक्तीला मोटरसायकल सह पोलीसांनी पकडले.गोडावून तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला 25 किलो गांजा हि जप्त केला.सदर कारवाई वेळी घटनास्थळी मोहाडी पोलिस ठाण्यातील सपोनि संगिता राऊत,ग्रामिण तहसील चे नायब तहसीलदार रवींद्र उपसनी,क्युआरटी पथकातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.