जळगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील सावखेडा शिवारातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरूषोत्तम विलास पाटील (वय-१४) रा. जलराम नगर, सावखेडा शिवार जळगाव हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहतो . १६ जानेवारी रोजी सकाळी९.३० वाजेच्या सुमारास मित्राकडे जावून येतो असे वडिलांना सांगून गेला. मात्र सायंकाळपर्यंत पुरूषोत्तम हा घरी आला नसल्याने त्याचा नातेवाईकांनी शोधाशोध केली. मुलगा मिळून आला नाही म्हणून वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.