चाळीसगाव ;- तालुक्यातील वाघळी येथील ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप रामदास धनगर (वय- ४५ रा. वाघळी ता. चाळीसगाव)असे मयताचे नाव आहे . दिलीप धनगर यांनी राहत्या घरातील छताला दोरी बांधून त्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण हे स्पष्ट झाले नसून गणेश जबरान जाने (रा. वाघळी ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.








