जळगाव ;– शहरातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेला लग्न कर असा आग्रह करून विनयभंग केल्याची घटना घडली असून दुसऱ्या घटनेत कानळदा रोडवर राहणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली असून या घटनांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , एका घटनेत २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहत असून हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे महिला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये कामाला निघाल्याअसता ओळखीचा आबीद तसलीम पिंजारी रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी हा (एमएच १९ एएफ ४८२१) क्रमांकाच्या दुचाकीने महिलेचा पाठलाग करून हॉस्पिटलपर्यंत आला. रिक्षातून उतरल्यानंतर संशयित आरोपीने महिलेला ‘मुझसे शादी कर, मै तेरा खर्चा उठाऊंगा’ असे सागून शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी २० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत शहरातील कानळदा रोड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय विवाहिता पायी जात असतांना शाहरूख खाटीक रा. लक्ष्मीनगर हा विवाहितेच्या समोरून येत असतांना तिच्या खंद्याला धक्का दिला. व ओढणी ओढून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याचा जाब विचारला असता संशयित आरोपी शाहरूखने विवाहिले अश्लिल शिवीगाळ केली. दोन्ही मुले व भाऊ धावत आल्याचे पाहून शाहरुखने पळ काढला. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.