पहूर, ता.जामनेर ;-पहूर येथे उच्च दाबाच्या वीजवाहिनीला धक्का लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे काल सायंकाळी घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अकिलखान पठाण असे मयत तरुणाचे नाव आहे .
अकिलखान पठाण हा तरुण रोजंदारीने मजूर म्हणून विद्युत कंपनीच्या ठेकेदाराकडे कामास होता. जळगाव -औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे नवीन तारा ओढण्याचे काम सुरु आहे. नवीन तारा ओढण्याचे काम सुरू असतांना अकिलखान शकीलखान पठाण हा तरुण सिमेंटच्या विज खांबावर चढला. . मात्र त्याच वाहिनीच्या जवळून ११ केव्हीए क्षमतेच्या वीजवाहिनीतून वीज प्रवाह सुरू होता. कामाच्या ओघात अकील उभा राहताच त्याच्या डाव्या हाताला मुख्य विज वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला आणि सुमारे २० फूटांवरून तो खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.त्या
याबाबात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत अकिलच्या मागे आई -वडील , लहान भाऊ , २ बहीणी असा परिवार आहे.








