मुंबई ;- कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात धुमाकुळ घातला आहे. अनेकांना या आजारानं बाधित केलं आहे. बॉलिबुडमध्येही कोरोने शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी अमिताभ आणि अभिषेक बच्चनला कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता बॉलिबुडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अनुपम खेर यांच्या आईची कोरोना तपासणी सकारात्मक आली आहे. दरम्यान कोरोनाचा चाचणी सकारात्म आल्यानंतर खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. अनुपम खेर यांचा भाऊ, वहिनी आणि पुतनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनुपम खेर यांचीही चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यासंबंधी मुंबई महानगर पालिकेला ही माहिती दिली आहे.