जळगाव ;- भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय ७१) यांचे आज सुमारे दुपारी १२.३० वा. मुंबई येथे कोरोना उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोरोनाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. जावळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे .