जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच असून आज दुपारी प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार पुन्हा ३६ रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची रुग्ण संख्या ९४५ इतकी झाली आहे . आज आलेल्या अहवालानुसार सावदा ११, रावेर ६ ,पाचोरा ७, चाळीसगाव ४ , यावल २, फैजपूर ४ , एरंडोल १, भडगाव १ , जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या ९४५ झाली असून आतापर्यंत ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२९ जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि ३६५ जणांवर उपचार सुरु आहे.