शेंदूर्णी ;- चरित्र्याच्या संशयावरून पतीने सोननदी पात्रातील पाण्यात पत्नीला बुडवून तिची हत्या केल्याची घटना १ रोजी घडली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
प्रकाश सुकलाल भिल हे आपल्या पत्नी मंगलाबाई प्रकाश मोरे (भिल) (वय-३६) रा. वावडदा ता. जळगाव ह.मु.फुकटपुरा, शेंदुर्णी असे एकत्र राहतात. १ मे रोजी दोघे जंगीपूरा शिवारातील सोननदी पात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. दरम्यान प्रकाशचे पत्नी मंगलाबाईच्या चरित्र्यावर संशय होता. सोमवारी सकाळी ११ ते ५ वाजेच्या सुमारास प्रकाश भिल यांनी आपल्या पत्नी मंगलाबाईचा सोननदीतील पाण्याचा बुडवून ठार केले. त्यानंतर स्वत:हून पहूर पोलीस ठाण्यात हजर होवून गुन्ह्याची कबुली दिली आहे. गजानन जनार्दन गायकवाड रा. फुकटपूरा, शेंदुर्णी यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे करीत आहे. मयताच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.