मुक्ताईनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. आज मराठीचा पाहिला पेपर होता. मात्र आज पहिल्याच दिवशी पहिल्याच पेपरची प्रश्नपत्रिका अवघ्या १५ मिनीटात फुटल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथे घडला आहे. धक्कादायक म्हणजे फुटलेला पेपर कॉपीबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर पोहोचला. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा कारभार भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.