बोदवड;- तालुक्यातील जलचक्र बु, व खुर्द येथील गावकऱ्यांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार रवींद्र जोगी व पंचायत समिती गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ यांना देण्यात आले.त्यात गावातील भुमी हीन,अल्पभूधारक शेतकरी व वंचित लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब यादीत सामाविष्ट करण्यात यावे,तसेच विभक्त राहत असलेल्या कुटुंबियांना नवीन रेशनकार्ड द्यावे अशा मागण्यांचा समावेश असून त्याचबरोबर गावातील रस्ते व गटारी दुरावस्थेमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून लवकरात लवकर येथील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या मार्गी लावाव्यात असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी युवक काँग्रेस सचिव सचिन पाटील,जलचक्र येथील शिवसैनिक धनराज पाटील,बंटी पाटील,संदीप पाटील,दिपक जाधव,गणेश पाटील,अमोल पाटील तसेच जलचक्र बु,व जलचक्र खुर्द गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.