धुळे: धुळे आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. धुळ्यात एका व्यक्तीला तर पालघरमध्ये एका महिलेला करोनाची लागण झाली असून दोघांवर तातडीने उपचार करण्यात येत आहे.
धुळ्यात तिरंगा चौक परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्याला ८ ते १० दिवसांपासून सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्ये आज रिपोर्ट आले असता त्याला करोना झाल्याचं स्पष्ट झाल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितलं. हा करोना रुग्ण कुणाच्या संपर्कात आला होता का? याची माहिती घेतली जात आहे.