अमळनेर;- मायाई बहुउद्देशिय संस्थे कडुन शहरातील हातमजुरी करणाऱ्या लोकांना दिले जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. सविस्तर वृतांत असे की, मायाई बहुउद्देशिय संस्थेकडुन अनेक सामाजिक कार्य केले जातात. सध्याच्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील हातमजुरी करणाऱ्या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आल्याचे पाहून संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णा रामसिंग बहारे (किरण बहारे ) यांनी आदिवासी, मागासवगीर्य भागातील जे हातमजुरी करून आपलं कुटुंब चालवीत होते पण होम कोरोटाइन मुळे मजुरी करणे मुश्कील झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आल्याने अश्या गरजू 70 कुटुंबाना किराणा माल वाटप केले व पुढे ही काही लोकांना किराणा वाटप करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रा मुकुंद संदानशिव सर, अर्जुन संदानशीव, आत्माराम अहीरे, ज्ञानेश्वर संदानशीव, गोकुळ बि-हाडे, गौतम वंडोळे, उदीलाल संदानशि,विजय सपकाळे, प्रा जितेश संदानशिव, व मिना संजय बहारे यांनी परीश्रम घेतले.