अमळनेर ;– अमळनेर शहरात प्रजापिता ब्रम्हकुमारीज विश्र्व विद्यालयाचे डॉ.उज्ज्वल कापडणीस डॉ. मल्हार देशपांडे यांनी हे विशेष अभियान सुरू केले आहे.
अमळनेरकर जनतेला उर्जा मिळावी याकरिता शहरात पाच ते सहा ठिकाणी योगाचे धडे दिले जात आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
व्यक्तीचे परिश्रम कमी असून व्यायाम नसल्याने यांचा दुष्परिणाम म्हणून अनेक समस्यांनी ग्रासले आहे आयुर्मान कमी होत चालले आहे.सकाळी काहींना व्यायाम करणे कंटाळवाणे वाटते आळस माणसाचा मित्र बनला आहे अंगातला आळस झटकून टाकला पाहिजे व
चांगले आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायामाची गरज आहे म्हणून प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या विद्यादिदी यांच्या प्रेरणेने प्राथमिक शिक्षक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पाच ते सहा ठिकाणी सकाळ, संध्याकाळ म्युझिकल योगा क्लास घेतले जातात.
या म्युझिकल व्यायामाने व्यायाम करण्याची आवड निर्माण होते ,सकारात्मक ऊर्जा मिळते, सकारात्मक विचार मनात येतात, मनातील नकारात्मक विचार निघून जातात, दिवसभर ताजेतवाने वाटते , मनाला आनंद मिळतो,वजन कमी होते, पचनक्रिया संबंधीच्या समस्या दूर होतात, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, ताण-तणाव दूर होतात थकवा जाणवत नाही, थकवा कमी होतो असे अनेक फायदे होतात.
हे क्लास अमळनेरमध्ये ओम शांती सेंटरमध्ये जितेंद्र वाणी व सौ कविता पवार,टाऊन हॉल येथे सौ.नेहा देशपांडे शिवाजी गार्डन, सौ.नूतन पारख नवीन मुंदडा नगर, मदने सर सुजान मंगल कार्यालय, पुजा गोकलानी व धनदाई महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वतः युवराज पाटील सर म्युझिकल योगा सर्वांकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतात घेतात त्यांच्या सोबतीला राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील मदतीला असतात.
पहाटे साडेपाचच्या सुमारास शिव बाबांच्या सुमधुर गीतांचे बोल अमळनेर करांच्या कानी पडतात या योगाने आपली पावलं म्युझिक संगीत तालावर सुरांच्या सानिध्यात संगीतमय योगा करतात. हे योगा प्रशिक्षण विनामूल्य या सेवाभावनेतुन दिले जात आहे .अतिशय उपयुक्त, आनंददायी ,प्रभावी व आरोग्यदायी उपक्रम आहे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षकांनी केले आहे सुनील पाटील,राजेंद्रसिंग पाटील, सौ.करूणा मॅडम , सौ योगीता सोनवणे,डी.बी बोरसे, शिवा पाटील, राजपूत सर,आदी शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने संगीतमय योगासाठी उपस्थित असतात.